भूम (प्रतिनिधी) - डॉ. राहुल घुले यांनी भूम, परांडा, वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांची हंगामी स्वरूपात व कायम डिपीच्या दुरुस्तीच्या कारणावाचून पाण्याअभावी पिकांची, जणावरांची होणारी अडचण, धावपळ लक्षात घेता बिघडलेल्या डिपीची वाहतूक करण्यासाठी मोफत वाहणाची सोय करण्यात आलेली आहे. 

आजपर्यंत डॉ. राहुल घुले यांच्या मोफत डिपी वाहतूक सेवेच्या माध्यमातून अवघ्या 6 महिन्यात 204 गावातील शेतकऱ्यांनी या मोफत डिपी वाहतुकीचा लाभ घेतला आहे. एका डीपीवर वीस ते पंचवीस कनेक्शन असतात. डिपीचा बिघाड झाल्यास वाहतूक व इतर खर्च मिळून अंदाजे 5 ते 6 हजार रुपये एवढा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. मोफत डिपी वाहतूक सेवा होत असल्याने शेतकऱ्यांचे 10 ते 11 लाख रुपये वाचले आहेत.

एकीकडे दुष्काळाच्या झळा वाढत असताना दुसरीकडे घाऊक कृषिमाल बाजारपेठेत मरगळ आणि बऱ्यापैकी मंदी असे चित्र वारंवार पाहवयास मिळत असल्याने शेतकरी बांधव अस्वस्थ होत आहेत. महागाई दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वारंवार बदलत असणारी सरकारी धोरणे शेतकऱ्याला मारक ठरत असली तरीही शेतकरी बांधवाना भूमिपुत्र डॉ. राहुल घुले यांचे मोफत डिपी वाहतुकीचे धोरण शेतकऱ्यांना तारत आहे. 


 
Top