तुळजापूर (प्रतिनिधी)-  6 जून रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अखिल भारतीय श्रीशिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या लाखो शिवभक्त मावळ्यांच्या उपस्थितीत साजरा होतो आहे. प्रतीवर्षाप्रमाणे  दि. 31 मे  रोजी तुळजापूरकरांना मिळालेल्या सेवेनुसार किल्ले रायगडाची गडदेवता आई शिर्काई देवीला मानाची साडीचोळी, तुळजाभवानी मातेच्या चरणाचे कुंकू तसेच 108 अबुंकी कवड्यांचा माळ्या ज्या की शिवराज्याभिषेक सोहळा दिनी, राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, होळीच्या माळावरील मूर्ती, शिर्काई देवी, जगदीश्वर व छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि अभिषिक्त चांदीची मूर्ती यांच्यासाठी कवड्याच्या माळा इ. पूजा साहित्य विधीवत देविचरणी ठेवून श्रीतुळजाभवानी मंदिरातुन  रायगडाकडे रवाना करण्यात आले.

मंदिरचे धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष सचिन ताकमोगे, विठ्ठल बाराते यांचे हस्ते सोहळ्याचे मानकरी, शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य सतीश खोपडे यांचेकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रदीप अमृतराव, उदय साबळे, साईराज खोपडे, कुमार टोले, अनिकेत अकरे, शुभम पवार, अभि सुरवसे, रुतूराज खानविलकर, समर्थ काळे, सुशांत काटमोडे सह शिवप्रेमी मोठ्या संखेने  उपस्थितीत होते.


तसेच भूम, बार्शी आणि तुळजापूर मधील पुजारी बांधव, शिवभक्त उपस्थित होते. यावेळी 6 जून रोजी या सोहळ्यास जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले.


महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या चरणाचे कुंकु, कवड्यांच्या माळा शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी येथील पंचायत समितीचे अभियंता कै. अण्णासाहेब बळवंते यांनी नेण्याची परंपरा चालु केली होती. दुर्दवाने त्यांचे अकाली निधन झाल्याने आता ही परंपरा शिवभक्त सतिश खोपडे सांभाळात आहेत.

 
Top