परंडा (प्रतिनिधी) - घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञाताने घरातील सुमारे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सरणवाडी येथे घडली. 

परंडा पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजे सरणवाडी येथील रहिवासी साखराबाई सुरवसे या घराबाहेर गेल्या असता चोरट्याने घरात ठेवलेले सुमारे 18 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. साखराबाई यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस स्टेशनमधे अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे अज्ञात चोरट्याचा पुढील तपास परंडा पोलीस करित आहे.

 
Top