कळंब (प्रतिनिधी)- येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अचानक दि. 24 रोजी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी  कापसे, संचालक रोहन पारख, संचालक कोल्हे नाना, व्यापारी असोसिएशन चे सर्व व्यापारी बांधव, माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन भागवत धस, शिवाजीराव धुमाळ कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य, सर्व कर्मचारी उपस्थित होते.  

बाजार समितीस मागील एक वर्षांपासून नावलौकिक प्राप्त झाला आहे. अजून ही बाजार समितीची प्रगती झाली. पाहिजे शेतकरी हित जोपसलं पाहिजे. शेतकरी सुखी तर सारे सुखी यासाठी प्रयत्न करा अशा सूचना ही माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी दिल्या. बाजार समितीच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. बाजार समितीच्या 26 एकर जागेबाबत नवीन प्लॅन करून एक व्यवस्थित व्यवसाय विकास आराखडा तयार करून बाजार समितीचा नावलौकिक करावा. यासाठी आवश्यक त्या परवानगी मिळ्ण्यासाठी व इतर बाबीसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले. बाजार समितीत आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल व मार्गदर्शन केल्या बद्दल  सभापती शिवाजी कापसे व व्यापारी असोसिएशन ने यथोचित सत्कार केला. यावेळी शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top