धाराशिव (प्रतिनिधी)- इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वी नंतर कोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे,हे आधी निश्चित करावे.निश्चित केलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी ठेवा.असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिला.

आज 24 जून रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशीव आणि जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांच्या संयुक्त वतीने पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर व पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटक म्हणून डॉ. ओंबासे बोलत होते. यावेळी ऑनलाईन आमदार राणाजगजितसिंह पाटील तर मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, मार्गदर्शक संतोष कार्ले, संजय मगर, संतोष राऊत, पांडुरंग मोरे, संजय देशमाने, मारुती बिरादार,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील मेळाव्यात ऑनलाइन सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. घोष म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी पदवी आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.  पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींनी सहभागी होऊन खाजगी कंपनीत रोजगाराचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हा कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी मानले.

 
Top