भूम (प्रतिनिधी)- रुटीन कर्मचाऱ्याला का काढले याचा जाब विचारण्यासाठी कामगार संघटनेचा पदाधिकारी अधिकाऱ्यांकडे गेले असता झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होता कामा नये, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर एकतर्फी कारवाई न करता दोघांवर कारवाई करावी. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव मधुकर सानप यांची वरिष्ठांकडे मागणी केली आहे.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूम आगारामध्ये चालक टी. पी. मोटे हे दि.20/06/2024 रोजी दुपारी 16:30 च्या दरम्यान कामगारा यांच्या समस्याबाबत कामगार संघटना अध्यक्ष  दि.पी. मोटे हे वाहतुक निरिक्षक  नागेश गायकवाड यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे कामगारांच्या समस्या मांडत असताना वाहतुक निरिक्षक नागेश गायकवाड यांनी त्यांचे म्हणणे कांही ऐकून न घेता तुझा कांही संबंध नाही आणि अरेरावी व अर्वाच्य भाषेमध्ये बोलण्यास सुरुवात केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली.

 
Top