परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील सिरसाव येथे उमेद बचत गटातील महिलांना दुग्धव्यवसाय प्रशिक्षणासाठी संपदा ट्रस्ट इंडसइंड बँक अंतर्गत चार दिवशीय मोफत प्रशिक्षण तर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी संजीवणी पंधरवाडा दिवस निमित्त शेंद्रीय शेती व फळबाग लागवड मार्गदर्शन सिरसाव येथील शेतकरी महिलांना लाभले. यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी एन एन लांडगे, सरपंच कुमार वायकुळे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रेरिका सिमा नवले, कृषि सखी वर्षा मिसाळ, पशू सखी जयश्री चोबे, कृषी सहाय्यक राहुल जाधव, प्रभाग समन्वयक विजय गवळी, प्रोजेक्ट ऑफिसर सुजित जगताप, मार्गदर्शक जिल्हा समन्वयक विकास गोफणे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top