भूम (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षक दस्तगीर पठाण यांनी लिहिलेले भावलेली माणसं भाग एक या पुस्तकाच्या लेखनाबद्दल एस फोर सोल्युशन्स या प्रकाशन संस्थेकडून 2024 चा साहित्यरत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. भुम तालुक्यातील गिरवली येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दस्तगीर पठाण यांचा मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आसिफ भाई जमादार संस्थापक अध्यक्ष यांनी भविष्यात असेच लेखणीच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करावे अशी भावना, व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी गौस शेख, खदीर शेख, अरफात शेख, मकसुद मोगल, जावेद भाई जहागिरदार, फिरोज पठाण, पैलवान आखिलेश जमादार आदी उपस्थित होते.

 
Top