परंडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथील विद्यार्थ्यांना परंडा तहसील कार्यालयाकडून शाळेतील  विद्यार्थ्यांना एकूण 100 रोपांचे वाटप करण्यात आले 

यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तहसीलदार  घनश्याम आडसूळ, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांच्या हस्ते दोन्ही प्रशालेतील मुलांना व मुलींना रोपांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार आडसूळ यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन केले. उत्कृष्ट वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 501, 301 व 201 रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. यावेळी रामचंद्र इंगळे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला दिनकर पवार, मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्या प्रशाला भाऊसाहेब सुर्यवंशी, नारायण शिंदे, शशिकांत माने, नामदेव पखाले,सतीश खरात,श्रीमती शुभांगी देशमुख तानाजी मिसाळ, श्रीमती बाबूधी घाडगे, आबासाहेब माळी, चंद्रकांत सुरवसे यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. शशी माने हे मागील वर्षापासून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण करण्याचे काम करित आहेत. परांडा तालुक्यात वृक्षारोपण चळवळ उभा करण्यासाठी माने व आप्पासाहेब बल्लाळ सतत काम करीत आहेत.  यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाकडून खाऊ वाटप करण्यात आले. उपस्थित सर्वांचे आभार तानाजी मिसाळ यांनी मानले.

 
Top