धाराशिव (प्रतिनिधी)-  दरोडा व घरफोडीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 26 जून रोजी सोलापुरातील पुणे नाका येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील तीन ग्रॅमची सोन्याची अंगठीही जप्त करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनात सातत्याने वाढ होत असून, गुन्ह्यातील आरोपी शोधण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता भर दिला आहे. दि. 26 जून रोजी पथक गुन्ह्यातील आरोपींच्या शोधाकरिता तामलवाडी येथे पेट्रोलींग करीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोऱ्या व घरफोड्यांतील बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील आरोपी पिंटू जगन्नाथ उर्फ जग्या भोसले हा सोलापूर येथील पुणे नाका येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून नमूद व्यक्तीला ताब्यात घेतले. विचारपूर केल्यानंतर त्यांने सांगितले की, मी व माझे इतर सहा साथीदारांनी मिळून तुळजापूर खुर्द गावालगत असलेल्या घरातुन रोख रक्कम 2 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी अभिलेखाची पाहणी केली असता, पोलीस ठाणे तुळजापूर, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हे नोंद असल्याची खात्री झाली. पोलिसांनी दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील एकुण 15 हजार रूपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करुन आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.

जिल्हा  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,  सचिन खटके, पोह हुसेन सय्यद, प्रदिप वाघमारे, मपोह शैला टेळे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, पोअं रवींद्र आरसेवाड, चालक संतोष लाटे, चालक प्रशांत किवंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top