भूम (प्रतिनिधी)- येथील श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये दि. 27 जूर  रोजी मार्च 2023 - 2024 परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात  आला. या प्रसंगी भूम पोलीस स्टेशनचे पीआय सूर्यवंशी, एसटी डेपो भूमचे आगार प्रमुख लांडगे, माजी मुख्याध्यापक घुले, लोकसेवा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय मोटे, सचिव सतीश देशमुख, कोषाध्यक्ष सत्येंद्र मस्कर, संस्था सदस्य डॉ. श्रीमान महादेवराव अंधारे, प्रशालेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, पत्रकार, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी कुमार कुणाल किरण जाधव द्वितीय विद्यार्थिनी कुमारी ओजस्वी मेनकुदळे तृतीय क्रमांक कुमार अथर्व कुलकर्णी व इ. 8 वी. एन एम एम एस परीक्षेत धारक विद्यार्थी , नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top