कळंब. (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र चाकरवाडी येथे हभप.  ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 24 व्या पुण्यस्मरणार्थ द्वीतपपूर्ती सोहळा यानिमित्त  दि. 15 जून ते 21 जून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्त कळंब शहरातील माऊली भक्त गेली 24  वर्षापासून प्रतिवर्षी 101 पोते साखर श्री क्षेत्र चाकरवाडीकडे पाठवतात. 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 14 जून रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एल.जी. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली भक्तांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून 101 पोते साखर असलेला टेम्पो कळंबहुन श्री क्षेत्र चाकरवाडीकडे रवाना करण्यात आला. याप्रसंगी  डॉ. एल. जी. जाधवर, युवराज मुरकुटे, पोउनि रामहरी चाटे, रामहरी कोल्हे, राजेश ओझा, दिलीप टोणगे, करसन पटेल, अशोक बोराडे,  सुरेश टेकाळे, सुरेश कल्याणकर, नाना जाधवर, डॉ. अभिजीत जाधवर, राजेंद्र बिक्कड, अशोक मोडवे, डॉ.अविनाश जाधवर, शिवाजी केंद्रे, पिंटू जाधवर, विशाल  जाधवर,  संजय देशमुख, माणिक बोंदर यांच्यासह माऊली भक्तांची उपस्थिती होती.

 
Top