धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये इ. 5 वी ते 10 वीत सहशिक्षक मनोज भुसे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीधर शिक्षण घेतले. अल्पावधी कार्यकाळात दिल्ली येथे केंद्रीय परिक्षेत यश संपादन करुन मुळगाव धाराशिव तालुक्यातील माकडाचे उपळा येथील रहिवासी केंद्रीय सचिवालय नवी दिल्ली भारत सरकार वर्ग 1 अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. कृष्णा रामचंद्र गौरकर व मातापिता यांचा देवीची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ, सन्माचिन्ह, के.टी. पाटील ग्रंथ आदर्श शिक्षण प्रसारक मंडाळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्था प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, शाळा प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  प्राचार्य  उपप्राचार्य संतोष घार्गे, पर्यक्षक यशवंत इंगळे, सौ.बी.बी.गुंड, सेवानिवृत्त शिक्षक एन.एल. गोरसे आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top