तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अजित इंगळे यांच्या वतीने नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे इ. 1 ली ते इ. 7 वीतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी अजित इंगळे, मुख्याध्यापक गणेश रोचकरी, युसुफ शेख, श्रीकांत रसाळ, आरिफ बागवान, गणेश अणदुरकर, प्रशांत अणदुरकर, जालिंदर राऊत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र कावरे यांनी केले. अरिफ बागवान व युनुस शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सहशिक्षक केरण लोहारे, बाळासाहेब जेटीथोर, सुज्ञानी गिराम, विद्यादेवी स्वामी, शिवा डाके सह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

 
Top