धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका असणे गरजेचे आहे आणि समाज कल्याण विभागात स्वतंत्र अशी अभ्यासिका असुन ती सर्व विद्यार्थ्यांना खुली करुन द्यावी अशा प्रकारचे लेखी निवेदन समाज कल्याण विभागाला दिले आहे.

निवेदनात म्हटले की,शैक्षणिक वर्ष चालु झाले आहे,जिल्ह्यातील प्रमुख शहर धाराशिव असुन तालुक्यातील,ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांना अभ्यास,सराव करण्यासाठी शासकीय सार्वजनिक अभ्यास केंद्र असणे गरजेचे असुन आपल्या समाज कल्याण विभागात स्वतंत्र अशी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेली अभ्यासिका असुन ती बंद स्वरुपात आहे. या अभ्यासिका केंद्रात कर्मचारी उपलब्ध केले तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभच होणार आहे. युपिसी, एमपीएससी, राज्यसेवा पुर्व परीक्षेची तयारी सह इतर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी अभ्यास करतील. समाज कल्याण विभागातील अभ्यासिका सर्व विद्यार्थ्यांना खुली करुन सहकार्य करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी समाज कल्याण विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्याकडे मागणी केली आहे. चर्चा दरम्यान सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, संजय गजधने, बलभीम कांबळे, स्वराज जानराव, विशाल घरबुडवे उपस्थित होते.


 
Top