धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव या महाविद्यालयाला बेंगलोर येथील नॅक पुनर्मूल्यांकन समितीने दिनांक 27 आणि 28 जून 2024 रोजी भेट दिली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सदर समितीचे चेअरमन हरियाणा येथील कुरुक्षेत्र विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. राजेश कुमार हे होते. समितीचे सदस्य समन्वयक तामिळनाडू येथील गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूट, गांधीग्राम येथील अधिष्ठाता, प्रोफेसर डॉ. राथकृष्ण लक्ष्मण हे होते. तर सदस्य मिझोराम येथील गव्हर्मेंट आयझॉल नॉर्थ कॉलेज आयझॉल चे प्राचार्य डॉ. एस.एच माटे हे होते.  दोन दिवसीय तपासणीनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी समितीचे आभार मानले.

 
Top