धाराशिव (प्रतिनिधी) - मागील 15 वर्षांपासून दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून शासकीय रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांचे प्राण वाचविण्यास मदत करणाऱ्या प्रसेना प्रतिष्ठानचा जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय संचलित शासकीय रक्तकेंद्राच्यावतीने सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संस्था, संघटना आणि रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवार, 28 जून रोजी पार पडलेल्या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक ईस्माईल मुल्ला, डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. भास्कर साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, रूग्णकल्याण समितीचे गणेश वाघमारे व अब्दुल लतीफ आदी उपस्थित होते. यावेळी प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप बनसोडे, विकी बनसोडे, अमर माळाळे, प्रज्येात बनसोडे, नागराज साबळे, दादासाहेब मोटे, सचिन डोंगरे, रूपेश बनसोडे, सुमेध क्षीरसागर, जीवन भालशंकर, प्रसेनजित सरवदे, क्षमीनल सरवदे, स्वप्नील बनसोडे आदी सदस्य उपस्थित होते.


 
Top