तुळजापूर (प्रतिनिधी) -महाविकास आघाडीच्यावतीने तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे, गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन दि. 21 जुन 2024 रोजी करण्यात आले. 

गिरीश महाजन यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना अपशब्द वापरल्याबद्दल, तुळजापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करून प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. शाम पवार, राहुल खपले, बाळासाहेब शिंदे, प्रतीक रोचकरी, नवनाथ जगताप, अनमोल साळुंखे, अमोल जाधव, शरद जगदाळे, अक्षय कदम, सचिन जाधव, सुनील जाधव, सागर इंगळे, विकास भोसले, यांच्यासह महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top