कळंब (प्रतिनिधी)-शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक पठाण जे . एन. यांनी केले.यावेळी विद्यालयाचे  पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे, सहशिक्षक परमेश्वर मोरे, प्रतिभा गांगर्डे  यांनी योगशिक्षक म्हणून कामगिरी बजावली. यामध्ये सूक्ष्म व्यायाम प्रकार, सूर्यनमस्कार, जॉगिंग, अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका आदी योगासने, प्राणायाम घेण्यात आली. 

योग शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे ज्ञानेश्वर तोडकर,जीवन सिंहठाकुर,शंकर गोंदकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top