धाराशिव (प्रतिनिधी)- सावित्रीच्या कविता या पन्नास कवयित्रींच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित कवितांचे प्रकाशन दि. 23 जुन रविवार रोजी धाराशिव येथे स्वयंवर मंगल कार्यालयात 10. 30 वाजता संपन्न होत आहे.

या पुस्तकाचे संपादन डॉ. रेखा अनिल ढगे धाराशिव व कविता रमेशराव पुदाले नळदुर्ग यांनी केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रविंद्र चिंचोलकर अपूर्वाई प्रकाशन पुणे यांनी केले आहे. याच कार्यक्रमात कवयित्री शिवनंदा माळी, धाराशिव यांच्या सय या कविता संग्रहाचे व कै. अलकनंदा ढगे यांच्या मातीचे जग या कविता संग्रहाचे पण प्रकाशन होणार आहे. ही दोन्ही पुस्तके डॉ. उमा काळे-माळी यांच्या ज्ञानसूर्य प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. या कार्यक्रमासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते प्रसिद्ध कथाकार डॉ. भास्कर बडे हे आहेत.

जेष्ठ साहित्यिका कमल नलावडे या अध्यक्ष स्थान भुषविणार आहेत. अक्षरवेल अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख यांची पण प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात सावित्रीच्या कविता या पुस्तकात सहभाग देणाऱ्या सर्व कवयित्रींना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top