भूम (प्रतिनिधी)- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध भूम पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी भूम शहरातील गोलाई चौकात मयताचे प्रेत ठेवुन दोन तास रस्ता आंदोलन केले. यामुळे काही काळ तनावाचे वातावरण झाले होते. शेवटी गुन्हा दाखल करुन आरोपीना अटक करु असे पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नामे सीताबाई मछिंन्द्र काळे हिने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सीताबाई हिने रवींद्र आबा काळे रा. सरमकुंडी ता. वाशी यांच्याकडून उसतोडीसाठी 45 हजार रुपये उचल घेतली होती. उसतोडीचा हंगाम पार पडल्यानंतर फिर्यादी व तिचा मुलगा यांच्याकडे त्या हंगामातील मधील 25 हजार रुपये फिरल्यामुळे रवींद्र उर्फ बबलू आबा काळे याने त्याच्या वाकवड येथील पाहुणा रामा आप्पा शिंदे यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामास ठेवले होते. दिनांक 19 जून 2024 रोजी वाकवड येथे रामा शिंदे रा. वाकवड यांच्या घरी बसल्यावर रवींद्र काळे, रा सरमकुंडी, रामा आप्पा शिंदे रा वाकवड, दादी नानी पवार रा. सरमकुंडी, सोनाबाई बबलू काळे रा. सरमकुंडी व लताबाई रामा शिंदे रा. वाकवड या पाच आरोपींनी मयत भीमा मछिंन्द्र काळे व फिर्यादी हिस शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर भीमा हा घराबाहेर निघून गेला व लवकर घरी न आल्याने त्याचा शोध घेतला. तेंव्हा त्याने आंब्याच्या झाडाला अंगातील शर्टच्या साहाय्याने गळफास घेतलेला दिसला. मयताच्या प्रेतावर भूम येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून वर नमूद आरोपींचे धमकी, मारहाण व त्रासाला कंटाळून मयत भीमा याने गळफास घेतला. या आशयाची फिर्याद भूम पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत तवार करत आहेत.

 
Top