तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये असलेल्या बोगस पुजाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर.यांना निवेदन देवून केली आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, श्री तुळजाभवानी मंदिरात अनेक बोगस पुजाऱ्यांचा वावर दिसुन येत आहे. ते यात्रेकरुची दिशाभुल करुन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करीत आहेत. त्यामुळे तुळजापूर येथील पुजाऱ्यांची प्रतिमा मलीन होत आहे. यात्रेकरुमध्ये पुजाऱ्याविरुध्द गैरसमज पसरत आहे. दिनांक 11 जून रोजी मंगळवार रोजी पहाटे 4:20 वाजता नगर वेताळ झोपटपट्टी येथील एक व्यक्ती हा पुजारी नसताना मंदिरमध्ये गाभाऱ्यात पुज्या विधी व्यवसाय करीत होता. मी त्यास तु पुजारी नाहीस मग पुजा विधी व्यवसाय का करीत आहेस असे विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ केली. त्याच्या सोबत मंदिर मधील कर्मचाऱ्याशी संबंध असल्यास तो मंदिरच्या गाभाऱ्यात कसा गेला याची सीसीटीव्ही फुटेज पाहुन चौकशी करुन योग्य ती कारवाही करण्यात यावी. तसेच मंदिरामध्ये असलेल्या सर्व पुजाऱ्यांची तपासणी करुन बोगस पुजाऱ्यावर मंदिर प्रवेशाची कायम बंदी करण्यात यावी. जेणेकरुन येणाऱ्या भाविकांची लुट थांबेल.

तरी बोगस पुजाऱ्याबाबत तात्काळ योग्यती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मंदिर प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबादारी मंदिर संस्थानची राहील याची नोंद घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर रमेश रंगनाथराव कदम (चिवचिवे), राजेश्वर कदम, किरन कदम,पांडुरंग पलंगे यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top