तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत आजुबाजुच्या पन्नास किलोमीटर भागातील देविभक्त मोठ्या संखेने आपल्या दुचाकीवर येत असल्याने येथे दुचाकी वाहनतळ समस्था गंभीर बनली आहे. दुचाकी वाहने थेट मंदीराकडे नेणे शक्य होत असल्याने सध्या श्रीतुळजाभवानी मंदीरांकडे जाणाऱ्या भवानी रोड, कमानवेस रोड, शुक्रवार पेठ रोड या प्रमुख रस्त्यावर मोठ्या संखेने मध्य भागी हजारो दुचाकी मोटार सायकल लावल्या जात आहेत. याचा फटका भाविकांना मंदिरात ये-जा करताना बसत आहे.

सध्या शहरात पाच ते सात हजार व बाहेरून येणाऱ्या पाच हजार असे दहाहजार दुचाकी वाहने शहरात येत आहेत. त्यामुळे यांचा वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भवानी रोडवर मध्य भागी दुचाकी लावा व पुजेचे साहित्य घ्या अशी आँफर व्यापारी देत असल्याने भवानी रोडवर गर्दी दिवशी हजारो दुचाकी मध्य भागी लागत आहे. तशीच परिस्थिती शुक्रवार पेठ पाणी टाकी रस्त्यावर आहे. सध्या तर गर्दी दिवशी ही दुचाकी दोन्ही महाध्दार समोर लावल्या जात आहेत. दुचाकी वाहनांची अडवणूक किंवा  तपासणी न होता थेट मंदिर महाध्दार समोर येत असल्याने भाविकांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे दुचाकी लावण्यावरुन सतत भाविक सुरक्षारक्षक यांच्यात शाब्दीक चकमकी होवुन त्याची पर्यावसन भांडणात होत आहे. यातच सध्या 42 अंशावर तापमान जात असल्याने इंधन टाकी गरम होवुन दुर्घटना घडण्याचा संभाव्य धोका आहे. मंदीर परिसरात जसे चारचाकी किंवा इतर वाहनांना ज्या प्रमाणाने प्रशासनाकडुन बंदी घातली आहे. त्याप्रमाणे भविष्यात मंदीर आणि भाविकांना निर्माण होणाऱ्या धोक्या संरक्षणासाठी मंदीर परिसरात दुचाकी वाहनास बंदी घालणे गरजेचे आहे. दुचाकी वाहन तळ कार्यान्वित करणे गरजेचे बनले आहे.


श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरातील लावलेल्या दुचाकी दररोज  पोलिस व नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईने गाडीत या गाड्या पोलिस स्टेशन मध्ये आणल्या जातात तिथे दंड फाडून सोडुन दिले जाते. माञ दुचाकी मंदीर परिसरात येवुच नये यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

 
Top