तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसला खुर्द शिवारातील काटी रस्त्यावरील परिसरातुन वाहणाऱ्या एका लहान ओढ्यातुन रविवार दि. 9 पासुन राञी निळसर पाणी वाहु लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागातील खचखळग्यातुन अचानक पणे एकाच भागातुन निळसर पाणी वाहणे मागचे कारण शोधण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द शिवारातील काटी रस्त्यावर तलाव असुन, याचा खालील भागातील ओढ्यातुन अचानक निळे पाणी वाहु लागले आहे. अखंडीत हे निळसर पाणी वाहत असुन, हे पाणी बार्शी तालुक्यातील आळजापूर तलावापर्यत पोहचले आहे. या निळसर वाहणाऱ्या  पाण्याबाबतीत अनेक चर्चा होत आहेत. संबंधित भागास तलाठ्याने भेट देवुन पाहणी केली आहे.

सध्या मृग नक्षत्रचा पाऊस पडत आहे. शिवारातील पावसाचे पाणी खाच खळग्यातुन उतरत्या भागाला वाहत आहे.  मात्र येथील एका खड्यामधून पाण्याचा झऱ्यातून निळसर पाणी अचानक वाहु लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निळसर वाहणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गर्दी होत आहे.

वीज पडल्याने निळसर पाणी झाल्याची शक्यता  -तहसिलदार अरविंद बोंळगे

मसला खुर्द भागात निळसर पाणी वाहत असल्या प्रकरणाबाबतीत तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या भागात वीज पडल्यामुळे भुगर्गाभातील हालचालीमुळे पाणी निळसर झाल्याची शक्यता तेथील तलाठ्याने वर्तवली आहे. या निळसर पाण्याचा मागचे कारण शोधण्यासाठी वरिष्ट पातळीवर याची माहीती सादर करणार असल्याची माहीती तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.

 
Top