भूम (प्रतिनिधी)-शिवसेनेचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच खासदार ओमदादा यांनी लोकसभेमध्ये 3 लाख 22 हजार मताधिक्याने निवडून आल्याच्या नंतर सत्कार व बॅनरबाजी याचा खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करावे. या आव्हानाला प्रतिसाद देत भूम तालुक्यातील बिरोबाचीवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

भूम तालुक्यातील ग्रामीण भागातील बिरोबाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन,पुस्तक, टिफिन बॅग व तसेच इतर शालेय उपयोगी साहित्य शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना युवासेनेच्या वतीने मोफत वाटप करण्यात आले. हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचे छोटे रोपट संघटना रुपी लावले आज त्याचा विस्तारलेला वटवृक्ष आपल्याला दिसतो. आज पर्यंतच्या शिवसेनेच्या प्रवासामध्ये शिवसेनेला अनेक धक्के पचवावे लागले. परंतु त्यातूनही शिवसेनेने फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी घेऊन सक्षमपणे उभा राहिली हा इतिहास शिवसेनेला साक्षी आहे. तसेच शिवसेनेचे ब्रीदवाक्य 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याला अनुसरून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही तालुक्यात राबवत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहूत असे मत कार्यक्रमा दरम्यान युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अविनाश गटकळ, गणप्रमुख जावेद तांबोळी, अंकुश आबा बोराडे,जगदीश तिकटे, सुहास आतकर, नवनाथ यादव, शहाजी भोगील, युवराज भोगील यांच्यासह शालेय विद्यार्थी व तसेच सहशिक्षक शिंदे आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरासाठी उपयोगी साहित्य शिवसेनेच्या वतीने दिल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. 

 
Top