धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील बावी येथील पेट्रोल पंपावर कंटेनर गाडी रात्री मुक्कामाला थांबली असताना त्या गाडीतील चालक सुदाम मोराळे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्याच्याकडून गाडीतील डिझेल व रोख रक्कम असा एकूण 9 हजार 280 रूपये घेवून पसार झालेल्या आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने माहिती घेवून तातडीने आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील सुदाम शेषेराव मोराळे, वय 31 वर्षे, रा. तुकूचीवाडी ता. केज जि. बीड यांचे ताब्यातील कंटेनर गाडी क्र एमएच 44 यु 9817 ही बावी शिवारातील तुळजाई पेट्रोल पंपाचे समोर रोडवर लावून झोपले असता अनोळखी पाच व्यक्तीने यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन गाडीतील अंदाजे 7 हजार 280 रूपये किंमतीचे गाडीतील डिझेल व रोख रक्कम 2 हजार रूपये असा एकुण 9 हजार 280 रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या संदर्भात अनेक वाहन चालकांच्या डिझेल चोरी संदर्भातील तक्रार आल्याने धाराशिव शहर पोलिस ठाणे, धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे, तुळजापूर पोलिस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हे नोंद झाले होते. यासंदर्भात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अधिक माहिती घेतली असता एक फिक्कट सोनेरी रंगाची बोलेरो गाडी ज्यामध्ये पाच ते सहा इसम दरोडा टाकून मोहा ते कळंबकडे तेर मार्गे जात आहेत. अशी महिती मिळाल्याने पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करून एकास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी उर्फ पुण्या आप्पा शिंदे, वय 37 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सागिंतले की, मी व माझे इतर चार साथीदार यांनी नमुद गुन्हे केल्याचे कबुली दिली. यावरुन पथकाने त्याच्या ताब्यातुन अंदाजे 5 लाख 36 हजार किंमतीचे डिझेलचे प्लॅस्टीकचे केन्डे, मोबाईल फोन, लोखंडी रॉड, एक लोखंडी चाकू, बांगडी पाईप, बोलेरो गाडी असा माल जप्त केला.

जिल्हा  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ काझी, पठाण, औताडे, पठाण, काझी कोळी, माचेवाड, तसेच पोस्टे ढोकी येथील सपोफौ सातपुते, क्षिरसागर, गोडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top