भूम (प्रतिनिधी)-भूमिपुत्र डॉ. राहुल भिमराव घुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि.13 जून रोजी गुरूवारी आठवडी बाजाराचे औचित्य साधून भूम शहरासह तालुक्यातील  86 वयोवृद्ध नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप  करण्यात आले. तसेच मोफत आधाराची काठी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तब्बल 86 वयोवृद्ध आज्जी आजोबांना मोफत आधाराच्या काठ्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिकांनी या सर्व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. डॉ.राहुल भिमराव घुले यांचे आभार व्यक्त केले. आरोग्यमित्र डॉक्टर राहुल घुले यांच्यामार्फत भूम, परंडा, वाशी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.


 
Top