धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील खिरणीमळा परिसरात असलेल्या रसूलपुरा येथील अब्दुल रसूल बाबा दर्गाह येथे सार्वजनिक सभागृह (शादी खाना) बांधकामाचे भूमिपूजन या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दि.21 जून रोजी टिकाव मारून करण्यात आले.

धाराशिव शहरातील खिरणीमळा परिसरातील रसुलपुरा येथील अब्दुल रसुल बाबा दर्गाह परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत सार्वजनिक सभागृह (शादी खाना) च्या बांधकामासाठी आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पंधरा लाख रुपयांचि निधी दिला आहे. त्यामुळे या परिसरातील गोरगरीब नागरिकांचे मुला मुलींची लग्नकार्य व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. त्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यापूर्वी या ठिकाणी धर्मगुरू तौफिक मौलाना यांनी सार्वजनिक प्रार्थना घेतली. तर भूमिपूजन जेष्ठ नागरिक मुस्ताक कुरेशी, नवाब मोमीन, शौकत शेख, खालील पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बिलाल तांबोळी,एक तेरा साथ ग्रुपचे अध्यक्ष अहमद कुरेशी, मिलिंद पेठे, करीम लाला, नजीर शेख, मुनीर शेख, असलम कागदी, आयाज पठाण, आयाज कुरेशी, आयाज कुरेशी, कलीम कुरेशी, कलीम पठाण अलीम पठाण, मकबुल टकारी, कलीम कुरेशी, आयपास कुरेशी, खालील कुरेशी, बापू गायकवाड आदींसह इतरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top