भूम (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हितासाठी भूम परंडा वाशी तालुक्यातील आरोग्यापासून त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत रुग्ण सेवा मिळावी या भावनेतून धाराशिव एस टी महामंडळाकडून भूम बस डेपोमार्फत भूम ते डहाणू बस चालू केली. आरोग्य दूत डॉ. राहुल घुले यांनी मंत्रालय येथे पाठपुरावा करून भूम तालुक्यातील तसेच भूम परंडा वाशी मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी ज्या चाली करून भूम ते डहाणू बस बंद पाळण्यात आली होती त्याच्यावर मात करीत पुन्हा डहाणू डेपोची डहाणू भूम भूम ते डहाणू अशी बस सेवा पूर्ववत चालू केली असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून डॉक्टर राहुल घुले यांचे आभार तसेच कौतुक केले जात आहे. 

“सौ सोनार की एक लोहार की“ अशा म्हणीप्रमाणे राजकीय लोकांनी केलेल्या चालीवर मात करीत आरोग्य दूत राहुल घुले यांनी सर्वसामान्यांच्या हिताला न्याय देण्याच्या बाजूने पुन्हा डहाणू बस सुरुवात केली

भूम परंडा वाशी तालुक्यातील सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना मोफत आरोग्य सुविधा सह जवळपास 250 च्या वर रुग्णांवर ऑपरेशन शस्त्रक्रिया करून त्या लोकांना आपल्या घरी सुखरूप पोहोच करणारे डॉ. राहुल घुले त्यांचे बंधू डॉ. अमोल घुले यांच्या या कार्याला बाधा पोहोचावी या हेतूने काही राजकीय मंडळींनी मोफत चालू असलेल्या आरोग्य सेवेला खेळ बसावी याच भावनेतून आगार प्रमुख धाराशिव व भूमच्या यांच्या वरती दाबावांनो डहाणू बस बंद केली होती. यामुळे भूम परंडा वाशी तालुक्यातील बहुतांशी लोकांना मोफत आरोग्य सुविधा घेण्यापासून मुकावे लागले तर काही नागरिकांना स्वतःच्या खर्चातून सौ कमल घुले फाउंडेशन यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा घेतली. भूम परंडा वाशी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ लागली आहे ही झळ कोणी लावली हे सांगण्याचे उचित नाही असे सांगत डॉक्टर राहुल घुले यांनी पुन्हा आपन चालू केलेल्या या भूम ते डहाणू बसचा लाभ भूम तालुक्यातील पेढा वितरक उत्पादक त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी आणि आरोग्य च्या दृष्टीने ज्यांना गरज आहे अशा सर्व लोकांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आमच्या या आरोग्य उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान डॉक्टर घुले यांनी भूम बस स्थानकात भूम ते डहाणू चाललेली बस ची पूजा करून रवानगी केली याप्रसंगी बसचे चालक वाहक यांना सत्कार करून त्यांना आरोग्य किट डॉक्टर घुले यांच्यामार्फत देण्यात आले

प्रसंगी सौ कमल घुले फाउंडेशनचे व्यवस्थापक सचिन जाधवर, रफिक पिरजादे, वसीम काजळेकर धनंजय शेटे, अजित बागडे, आशिष बाबर, आरोग्य टीम उपस्थित होते.

 
Top