कळंब (प्रतिनिधी)-तालुक्यातील  ईटकुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर कडील वंशज अक्षय शिंदे  चौंडी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली.

सकाळी 11 ते 5 पर्यंत जयंती उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

नंतर  मिरवणूकीस सुरुवात झाली ही मीरवणुक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली यात  चिमुकल्यांना अहिल्यादेवी होळकर यांचा पोषाख परिधान करून घोड्यावर बसून तलवार हातात देण्यात आली होती.तसेच यात विविध प्रकारचे ढोल पथक, कोल्हापूर येथील खंडोबा वसारीवाले वाघे , हलकी पथक, जागरण गोंधळाचे संभळ, घोडे लायटिंग शो च्या रथाच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीची गावभर भंडार्याची उधळण करत मीरवणुक काढण्यात आली. हि मिरवणुक एक आगळ्या वेगळ्या प्रकारे असल्यामुळे ईटकुर व परीसरातील नागरीकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती..

 मीरवणुक यशस्वी होण्याकरिता कमिटिचे अध्यक्ष सतिश कस्पटे,उप अध्यक्ष आकाश दाने, गणेश गिरे राजेंद्र घाटुळे, देविदास गायके श्रीराम वाघमारे,बालाजी घाटूळे, संतोष कस्पटे,लखन गिरे,दत्ता दाने ,शिवाजी गिरे, नवनाथ गायके,केशव कस्पटे प्रभाकर दाणे,मालोजी वाघमारे, तुषार घाटूळे प्रशांत घाटूळे, विशाल घाटूळे अमर गीरे कीशोर गीरे प्रणव गिरे, अशोक गिरे, सचिन गिरे,दादा कस्पटे,दादा वाघमारे, वैभव कस्पटे,संपत गिरे,चांगदेव कोरडे, विक्रम कोरडे,आश्रुबा गीरे, अर्जुन गिरे,अक्षय कस्पटे,सुशिल कस्पटे,आदींनी परिश्रम घेतले.

 
Top