धाराशिव (प्रतिनिधी)- 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित येवुन विजय पराजयाचे कारणांवरुन तसेच विजयी मिरवणुका काढण्याचे कारणावरुन मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने लोकसभा निवडणुक -2024 ची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता 4 जून 2024 रोजीचे 00.01 ते 04.06.2024 रोजीचे 24.00 वाजता दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय,धाराशिव मतमोजणी परिसराचे 100 मिटर अंतरावरील परिसर तसेच बेंबळी टी पॉइंट अहिल्यादेवी होळकर चौक आण्णाभाऊ साठे चौक, ख्याँजा शमशोद्दीन गाजी दर्गाह विजय चौक, नेहरु चौक, काळा मारुती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी  लागू केले आहे. या परिसरात उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, रस्ता रोको, ध्वनीक्षेपकाचा वापर इ. आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास या आदेशाने प्रतिबंध करण्यात येत आहे.


 
Top