भूम (प्रतिनिधी)-  स्वराज्य पक्षाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव वाढवावा, उर्वरित 75 टक्के विमा सरसकट वितरित करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी स्वराज्य पक्षातर्फे भूम उपविभागीय कार्यालयामध्ये लक्षणीय आंदोलन करण्यात आले. 

इतर राज्यामध्ये दुधाला 35 ते 45 रुपये भाव असून सुद्धा महाराष्ट्र मध्ये दुधाला 20 रुपये प्रति लिटर असा दर घसरल्याने तरुण शेतकरी व दूध उत्पादन शेतकऱ्यांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आली आहे. सरकार अथवा विरोधी पक्ष याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रातून 74 टक्के दूध केवळ खाजगी दूध संघ आणि कंपन्याला दिले जाते. त्यांच्या बाबतींमध्ये नियम बनवणे आवश्यक आहे. शासनाने पाच रुपये प्रति लिटर दिलेला अनुदान सुद्धा आज तारीख शेतकऱ्यांना मिळालेले नाही. लवकरात लवकर वरील मागण्या जर पूर्ण केले नाहीत तर दुग्ध मंत्री यांच्या तोंडावर दुधाच्या पिशव्या मारण्याचा इशारा स्वराज्य पक्षातर्फे देण्यात आला आहे. वरील आशयाचे स्वराज्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top