धाराशिव (प्रतिनिधी)- भूगाव जिल्हा अमरावती येथे दिनांक 7 ते 9 जून दरम्यान संपन्न झालेल्या सबज्युनियर (14 वर्षे) राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव मुलांच्या संघाने भंडारा, वाशिम, ठाणे, नाशिक या संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये धाराशिव मुलांच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात यजमान अमरावती संघावर (2-1) मात करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

या संघात  अभिषेक शिंदे (कर्णधार), शिवम शेळके, समर्थ झाडके, आदित्य शिंदे, समर्थ शिंदे, अनिकेत डोंगरे, अखिलेश अभंग, कृष्णा अभंग, शिवतेज गव्हार, भक्तीराज लोखंडे, अभिषेक शिंदे, आविष्कार डोंगरे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून हे यश संपादन केले. तसेच धाराशिव मुलींच्या संघाने ठाणे, सोलापूर, लातूर, भंडारा, जळगाव या संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अंतिम सामन्यात यजमान अमरावती संघासोबत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे रौप्य पदकावर (द्वितीय क्रमांक) समाधान मानावे लागले. या संघात सिध्दी डोंगरे (कर्णधार), कल्याणी घुले, अदिती राऊत, सारिका ओव्हाळ, प्रीती झाडके, ज्ञानेश्वरी शिंदे, अंजली भराटे, शिवानी शिंदे, सुहाना अवाड,साक्षी काटे, प्रतीक्षा माळी या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून हे यश संपादन केले. या दोन्ही संघाला अचलपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, प्रशस्तीपत्र, व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही संघाला जिल्हा संघटनेचे सचिव तथा राज्य संघटनेचे सहसचिव शरद गव्हार, अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, दिपक शिंदे, सौरभ शिंदे, भैरवनाथ राऊत, तुषार डोंगरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू शितल शिंदे, शिल्पा डोंगरे, प्रीती शिंदे, वैष्णवी शिंदे, अशोक आसबे, निलेश माळी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंना जिल्हा संघटनेचे सहसचिव नानासाहेब भक्ते यांनी खेळाडूंना कीट देऊन सहकार्य केले. 

 
Top