कळंब (प्रतिनिधी)-मंगरूळ हे कळंब तालुक्यातील मोठे गाव असून, येथील मुख्य रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. कळंब -मंगरूळ रस्त्यावरील खड्डयामुळे नागरिकाचे हाल होत आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या तोंडावर, रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. रस्त्यावरील खड्डेयामुळे वाहन चालवणे खूपच धोकादायक झाले आहे. अपघाताची शक्यता सतत भेडसावत असते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या रस्त्यावर पॅचवर्कचे काम काही महिन्यापूर्वी झाल्याचे नागरिक सांगत असून, सध्याची स्थिती पाहता पॅचवर्कवर झालेला हा खर्च पाण्यात गेल्याचे दिसते.

याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष दिसून येत नाहीत असे नागरिकाकडून प्रतिक्रिया आल्या. पावसाळ्याच्या अगोदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यकता आहे. कारण याच रस्त्याने शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयांचे विद्यार्थी, मंगरूळच्या प्रशासकीय कार्यालयात दैनंदिन येणारे अधिकारी, कर्मचारी वर्ग येत असतो त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. प्रशासनाने या समस्याकडे तातडीने लक्ष देऊन उपाय योजना केल्यास पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.

मंगरूळ -कळंब रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करीत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवत असताना वाहनाच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे-

नवनाथ भराडे (ग्रा.प. सदस्य).

मंगरूळ -कळंब रस्त्याच्या संदर्भात मंगरूळ ग्रामपंचायतने पाठपुरावा करण गरजेचं आहे व बांधकाम विभागाने सुद्धा यामध्ये लक्ष घातले पाहिजे-

अच्युतराव पाटील (ज्येष्ठ नागरिक).

पिंपळगाव ते मंगरूळ, खामसवाडी या रस्त्यांचे टेंडर (निविदा) झालेली आहे. वरील काम चालू करावे ही बांधकाम विभागाकडे मागणी केलेली आहे.

आचारसंहितेमुळे व पाणी टंचाईमुळे कामास उशीर झालेला आहे.

मंगरूळ मधील खंडोबा मंदिर ते हनुमान मंदिर पाठीमागून जाणारा सिमेंट रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नाली, सदरील कामाचे टेंडर ( निविदा)झालेली आहे. ते काम त्वरित चालू करावे अशी मागणी पत्राद्वारे बांधकाम विभागाकडे केलेली आहे-

भागचंद बागरेचा (वि.वि. कार्यकारी सोसायटीचे चेअरमन)

 
Top