तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर व परिसराचा महाराष्ट्र शासनाकडून होवू घातलेला विकास आराखड्याला मदत व्हावी या प्रमुख उद्देशाने पंढरपूर देवस्थानचा सर्वकष झालेला विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी आज दि.27 जुन 2024 रोजी श्री तुळजाभवानी मंदिरचे शिष्टमंडळ गेले होते.

यावेळी शिष्टमंडळाने प्रथम श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या पुरातन विभागाच्या देखरेखेखाली मंदिरचा नव्याने झालेला दगडी गाभा-याची पाहणी केली. दर्शन मंडपाची, व्हिआयपी पासेस, वारकरी दर्शनाची सोय आदीची पाहणी करून भक्तांच्या सोयीसुविधांची माहिती घेतली. या शिष्टमंडळात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष सचिन ओंबासे, स्ट्रक्टवेल डिझाईनर अँड कन्सल्टंट प्रा.लि.तुर्भे नवी मुंबईचे कार्यकारी संचालक, पुण्याचे वास्तुविशारद हेमंत पाटील, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांत अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर देवस्थानचे मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदोलवार, तहसिलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी, पुजारी मंडळ पदाधिकारी, मंदिराचे अभियंते उपस्थितीत होते.


 
Top