धाराशिव (प्रतिनिधी)-जागतिक किर्तीचे कलादिग्दर्शक स्व. नितीन चंद्रकांत देसाई यांनी मुंबई - कर्जत  येथे उभारलेल्या एन.डी. स्टुडिओचे व्यवस्थापक स्व. नितीन देसाई यांचे चुलते श्रीकांत देसाई, पत्नी सीमा, मुलगा अजिंक्य, सुस्नेषा ऋतुजा अजिंक्य देसाई सह कुटुंब कुलदैवता श्री तुळजाभवानी माता अभिषेक पुजा करुन कुलाचार केला. पुजारी धनंजय मस्के यांनी यथोचित पुजा केली. त्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कूलचे  कलाध्यापक तथा संस्कार भारती प्रांत पदाधिकारी शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, सत्यहरी यांचे वतीने देवी प्रति देऊन सत्कार करण्यात आले. एन. डी. स्टुडिओवरील संकट दूर होवो असे साकडे देवी चरणी देसाई यांनी घातले.

 
Top