धाराशिव (प्रतिनिधी)- फ्लाईंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूल, धाराशिव शाळेचा सी.बी.एस.ई. बोर्डातून दहावी वर्गाचा 100% निकाल लागला आहे. शाळेचे सर्वत्र  कौतुक होत आहे. या यशाच्या पायाभरणीत वर्गशिक्षक  मल्ल,  पांडे,  बडवे, मोरे, प्राचार्य चतुर्वेदी, उपप्राचार्य जेकब  व सर्व सहकारी शिक्षक वर्ग यांनी वर्षभर परिश्रम घेतले आहे. विद्यार्थी, शिक्षक - शिक्षिका वर्ग याचे समस्त पालकांकडून कौतुक पाहायला मिळत आहे. 100% निकालाची परंपरा शाळेने जपली असून यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका वर्ग, विद्यालयाचे प्राचार्य, तसेच संचालकांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून येतेय. 

फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल स्कूल हे विविध उपक्रम, कार्यक्रम, कला कौशल्य, शैक्षणिक यश संपादनाच्या माध्यामातून कायम पालकांच्या चर्चेत असणारी शाळा आहे. सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांपासून सर्वांसाठी परवडेल अश्या माफक फीस मध्ये सर्वाधिक सुविधा व 100% शैक्षणिक प्रगतीची हमी देणारी ही शाळा आहे. त्याचप्रमाणे समाजाचा अभ्यास करत अनेक सामाजिक कार्यक्रमात सुद्धा शाळेचा नियमित सहभाग आपणाला पाहायला मिळतो. शैक्षणिक वर्षात अनेक उपक्रम, विविध परीक्षांचे आयोजन करत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्याच्या कला कौशल्य विकासासाठी सुद्धा शाळेचे विशेष परिश्रम पाहायला मिळते. 

त्याचप्रमाणे मागील महिन्यात शाळेत फाऊंडेशन वर्गाचे भव्य उद्घाटन देखील करण्यात आले. त्याचबरोबर सदरील फाऊंडेशन वर्गासाठी विद्यालय अतिरिक्त फीस न आकारता शालेय वार्षिक फीस मधेच ही विशेष सुविधा उपलब्ध करून देत आहे. फ्लाईंग किड्स येथे प्लेवे पासून ते दहावी पर्यंतचे उत्तम प्रवेश शैक्षणिक वर्षासाठी चालू झाले आहेत. या वर्षी धाराशिव, तुळजापूर तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावातून शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे.  आर्दश शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सुधीर  पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, विद्यालयाच्या संचालिका डॉ. मंजुळा आदित्य पाटील तसेच समस्त पालकांनी सर्व शिक्षक - शिक्षिका वर्गाचे, प्राचार्य  चतुर्वेदी यांचे कौतुक करत विद्यालयाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top