धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष पंडीत आगा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार वैद्यकीय सेलच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सिद्धाप्पा ताडेकर यांची निवड केली आहे. त्या निवडीचे पत्र जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात देण्यात आले.

या सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असणाया अडी-अडचणी सोडविण्यासाठी कार्यकराल व पक्ष संघटना उभी करावी अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमास भालचंद्र बिरादार, मुस्ताक हुसेनी, बालाजी डोंगे, अनिल जाधव, इकबाल पटेल, रमाकांत हजारे, बालाजी तांबे, जीवनराव बरडे, बाळासाहेब कणसे, इमराण पठाण, सरदार पटेल, शौकत मुजावर, नानासाहेब चव्हाण, अमर गुंड, रणविर इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मो संख्येने उपस्थित होते.

 
Top