धाराशिव  (प्रतिनिधी)-कृषी अवजारे, ठिबक, तुषार या योजनेचे 19.33 कोटी अनुदान त्वरीत शेतकयांना देण्यात यावे, अशी मागणी राष्टवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, कृषी खात्याअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन या याजनेखाली धाराशिव जिल्ह्यातील 8269 एवढ्या शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी करुन एक वर्षाचा कालावधी होवून गेला. तरीही त्यांना अपेक्षीत असलेली रुपये 19.33 कोटी रक्कम अद्याप मिळालेली नाही. मागील एक वषार्पासून या अनुदानासाठी शेतकरी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयामध्ये सातत्याने हेलपाटे मारत आहेत. वरील योजना मिळविण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पद्धतीने सर्व अटी शर्थी पूर्ण झालेल्या असताना देखील शेतकऱ्यांना हाल अपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत.

वरील साहित्य पूरवठा केलेले दुकानदार शेतकऱ्याकडे पैश्याचा तगादा करत आहेत. त्यातच मे महिन्यामध्ये 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एक वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांमुळे हवालदील झालेला आहे. यासाठी शासनाने गेल्या एक वषार्पासून थांबविलेले कृषी साहित्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या चार दिवसाच्या आत देणेबाबत आदेशीत करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 
Top