तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसला खुर्द शिवारातील काटी रस्त्यावर एका ओढ्यातून रविवारपासून (दि. 9) वाहणाऱ्या निळसर पाण्याची   वैज्ञानिकांमार्फत तपासणीत  करण्यात येवुन सदरील पाणी परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवल्याने पाणी परिक्षण अहवालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. धाराशिव येथील भुवैज्ञानिकांनी या ओढ्याची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. तेथून अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल अशी माहिती भुवैज्ञानिक मेघा शिंदे यांनी दिली आहे.

मसला ग्रामपंचायतसह इतर प्रशासकीय विभागाकडून गाव परिसरातील एका ओढ्यातून वाहणाऱ्या निळसर पाण्याच्या तपासणी साठी झालेल्या टाळाटाळीबाबत ग्रामस्थांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. सदरील पाणी दूषित असेल तर जमिनीवर त्याचा परिणाम होणार आहे. हे पाणी जिथे साचते त्या परिसरातील जनावरांनी हे पाणी पिले तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सदरील पाणी तलावात जात असल्याने पुढे तलावाचे पाणी दूषित झाले. तर जबाबदारी कुणाची यासह अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यातच या निळसर पाण्याबाबत प्रशासनातील मंडळी आपआपल्या तर्क व आकलणानुसार वेगवेगळी

कारणे सांगत होती. परंतु, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त होताच भुवैज्ञानिक मेघा शिंदे यांनी मसला येथे जाऊन सदरील ओढ्याची व पाण्याची पाहणी केली. 

 
Top