तुळजापूर  (प्रतिनिधी)- तुळजापूर न.प. मालकिची (न.प.पाठीमागील जागा) ताब्यात घेऊन त्या ठिकाणी दुचाकीसह वाहन तळ करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे. 

जिल्हाधिकारी यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि नगरपालिकेच्या पाठीमागील न.प.च्या मालकीची जागा जेथे आज कुलस्वामिनी शाळा भरवली जाते. वास्तविक पाहता आ.क. 28/ न.र. उ, बाद / 103 / दि.16/02/2000 हि जागा भाजी मंडईसाठी आरक्षित होती. परंतु न.प. तुळजापूर ने दि.26/03/1997 रोजी सर्वसाधारण सभेत सदर आरक्षण रद्द करण्याचा ठराव घेतला. व सदरील जागा जंगम समाजास देणे बाबत ठराव घेऊन हि न.प.ची

जागा समाजास दिली. परंतु दि.29/05/2000 रोजीच्या  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने घेतले गेलेला ठराव हा नियमबाहय व अधिनियमातंर्गत तरतुदीचे उल्लंघन करणारा असलेमुळे रद्द करीत असल्याचे कळवले. तरी आज तागायत हि सदरील जागा समाजाकडेच असुन, सदरील जागेत असलेल्या कुलस्वामिनी शाळेसाठी शासनाने जागा दिलेली आहे. तरी  जिल्हाधिकारी ंयांनी सोबत जोडलेल्या संचीकेचा (40पष्ठ) अभ्यास करून सदरील जागा लवकरात लवकर न.प.च्या ताब्यात घेऊन या ठिकाणी छोटी सी पार्कींग करावी. जेणे करून भवानी रोड, तहसिल कार्यालय, न.प. कार्यालय, पोलीस स्टेशन रोड वरती दुचाकी वाहनामुळे वाहतुकिस होणारा अडथळा बंद होऊन भक्तांची सोय होईल. तरी सदरील विषयाचा लवकर निर्णय घेण्याची मागणी पञकार परिषद घेवुन या भागातील नागरिकांनी केली. यावेळी भालचंद्र मगर, नागनाथ भांजी. एन. डी. शिंदे, नंदकुमार मगर, श्रीकांत धुमाळ, राजाभाऊ शिंदे, दत्ताभाऊ हुंडेकरी, नानासाहेब नाईकवाडी उपस्थितीत होते.

 
Top