कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. अक्षरा पिंगळे, पृथ्वीराज पिंगळे, समिक्षा पिंगळे, प्रार्थना पालके या विद्यार्थ्यांनी शाहु महाराजांच्या सामाजिक कार्यावर भाषणे केली. राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने मी ज्ञानी होणार या सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आणि सामाजिक न्याय दिना बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक धनंजय गव्हाणे, सरोजिनी पोते, मनिषा पवार, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.

 
Top