कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंबच्या प्रांगणात पत्रकारांच्या हस्ते वृक्ष पूजन व  वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हभप. महादेव महाराज अडसुळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून  नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेश सचिव डि.के. कुलकर्णी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, सतीश टोणगे यांची उपस्थिती होती. उपस्थित पत्रकार दिलीप गंभीरे, सतीश बप्पा टोणगे, संभाजी गिड्डे, सतीश मातने, माधवसिंग राजपूत, प्रदीप यादव, संदीप कोकाटे यांच्या हस्ते कदंब वृक्षाचे रोपन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष  महादेव महाराज अडसूळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वृक्षरोपण काळाची गरज असून  वृक्षारोपण चळवळ गतिमान व्हावी याचे महत्त्व नागरिकांना कळले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने अंगारकी चतुर्थी पर्व यानिमित्त  पोराणिक व बहुपयोगी औषधी अशा आपल्याकडील दुर्मिळ कदंब वृक्षाचे रोपण व पूजन कार्यक्रम पत्रकारांच्या हस्ते घेण्यात आला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट यांनी तर आभार प्रदर्शन बंडू आबा ताटे यांनी केले.

 
Top