तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातीलतेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत  प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.                                       

यावेळी शालेय समिती अध्यक्ष मुद्दसर शेख, शिक्षण तज्ञ जुनेद मोमीन, उपाध्यक्ष मुक्तार काझी, सदस्य अर्शाद मुलानी, मुजीब शेख, मुखील काजी, मुख्याध्यापक आर्शिया शेख उपस्थित होते. या कार्यक्रमात इयत्ता पहिलीत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता आठवी एन. एम .एम .एस. व शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षांकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापिका अर्शिया शेख यांनी आभार मानले.

 
Top