धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सत्ताधारी मंडळीच्या पराभूत मानसिकतेचे दर्शन होत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अवकाळी पावसाप्रमाणे अर्थसंकल्पात अवकाळी घोषणाचा पाऊस पाडला आहे. या सरकारचा वाईट अनुभव जनतेला आला आहे त्यामुळे आताही कितीही फसव्या घोषणा केल्यातरी जनता यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केलं.

छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन 30 हजार कोटीच्या घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी सरकारने केली नाही. हे सरकार फक्त फसव्या घोषणा देणारे असल्याचा हा पुरावा आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात कौल दिला आहे. त्याच पराभूत मानसिकतेतुन हा अर्थसंकल्प मांडला आहे. शेतकरी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून नापीकीमूळ आर्थिक अडचणीत आहे. त्यांना कर्जमुक्त करून त्यातून बाहेर काढण आवश्यक होते. सरकार अस्तित्वात आल्यापासून अगदी जाईपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आमदार पाटील म्हणाले.


 
Top