धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोग यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार मतदार यादीमधील ज्या मतदारांची नावे गळालेली आहेत किंवा चुकलेली आहेत. अशा मतदारांनी आपले नाव 5 जुलैपर्यंत दुरूस्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

ज्या मुलांना 1 जुलै रोजी 18 वर्ष पूर्ण होतील त्या मुलांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी विविध कॉलेजमध्ये विशेष मोहीम राबविली जाईल. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी जावून मतदार यादीमधील व ओळख पत्रामधील त्रुटी दूर करण्याकामी मोहिम राबविले जाईल. मतदारांनी आपले नाव मतदार यादी आहे की नाही याची खात्री करावी. मतदार यादी 25 जुलै 2024 रोजी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आदी ठिकाणी पहायला मिळणार आहे. दावे, हरकती नागरिकांकडून घेण्याची तारीख 25 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची ंअंतिम यांदी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रसिध्द होणार आल्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

25 कोटी खर्च

यावेळी पत्रकारांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाचा एकूण किती खर्च झाला यासंदर्भात विचारले असता जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी अंदाजे 25 कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगून अद्यापही काही बिले येणे बाकी आहेत असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाचे तीन प्रकरणे झाले होते. त्यापैकी एका प्रकरणात गुन्हा नोंद झाला असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची फायनल खर्चाची आकडेवारी 8 जुलैपर्यंत येणार असल्याचे सांगितले. 

 
Top