धाराशिव (प्रतिनिधी)- कारखाने बंद होवून आता दीड ते दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरीही जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल मिळालेली नाही. कारखान्यातील साखर जप्त करून शेतकऱ्यांना ऊसाचे बील तातडीने अदा करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पुणे साखर आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उसाची पहिली उचल मिळाली नसल्याने 3 एप्रिल रोजी आपणाकडे लेखी मागणी केलेली आहे. तरी देखील याबाबत आजतागायत काहीही कारवाई झाली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व जिल्हा बाहेरील साखर कारखाऱ्यांकडे ऊस पुरवठा केलेला आहे. साखर कारखाने बंद होवून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून पहिली उचल अद्यापर्यत देण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.


 
Top