तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखानाचालकाकडुन ऊसाचे बील देण्यास विलंब होत असल्याने सात दिवसाचा आत ऊस बील न दिल्यास 19 जून 2024 रोजी जुन्या बसस्थानक समोरील चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना यांनी मौजे काक्रंबा व काक्रंबावाडी येथील तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवाचे गेल्या चार महिन्यापासुन ऊसाचे बील मिळाले नाही. येणाऱ्या खरीप पिकासाठी खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने कारखान्याचे स्थानिक अधिकारी यांच्याकडे चौकशी केली तरी फोन बंद करतात. तसेच टाळाटाळ करत आहेत. तरी यापूर्वीही निवेदने दिलेली आहेत. परंतु त्यांनी त्याची दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही. तरी याची चौकशी करुन सर्व शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे बिल येत्या सात दिवसात मिळवून देण्यात यावे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने  19 जून 2024 रोजी तुळजापूर येथे जुने बस स्थानक समोर रास्तारोके करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे  निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अमोल जाधव, सतिश झाडे, विजय नन्नवरे, विमलचंद ठोंबरे, देविदास जेटीथोर, बोधला गायकवाड आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी देत आहेत.

 
Top