धाराशिव  (प्रतिनिधी)- पंधरा हजाराची लाख स्विकारताना पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये जप्त असल्याने सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी लोकसेवक प्रकाश नामदेव चाफेकर पोलिस हवालदार पोलिस ठाणे येरमाळा यांनी लोकसेवक महेश जालिंदर सांगळे (वय 37) चालक पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, तुळजापूर यांच्या मार्फतीने तक्रारदार यांचेकडे 15 हजार रूपये लाचेची मागणी करून 15 हजार रूपयांची लाच  रक्कम पंचांसमक्ष 26 जून रोजी स्विकारल्याने लोकसवेक प्रकाश चाफेकर यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे. ही कारवाई सापळा अधिकारी विकास राठोड, पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलिस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांनी पार पाडली. 

 
Top