धाराशिव (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रवि माळाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर तथा धाराशिव जिल्ह्याचे रिपाई निरीक्षक किशोर थोरात, जॉईन्ट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक घेवून रवि माळाळे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

या बैठकीस मराठवाडा सचिव आनंद पांडागळे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य एस. के. चेले, मराठवाडा संघटकर हरीश डावरे, मराठवाडा प्रदेश सचिव बंडू बनसोडे, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, धाराशिव तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, आयटी सेल आकाश बनसोडे, आदीसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top